दोन वर्षांत केवळ अडीच टक्के काम पूर्ण; एमएसआरडीसीकडून कंत्राटदाराला नोटीस

मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मागील दोन वर्षांत केवळ अडीच टक्केच काम पूर्ण झाले आहे. हा वेग पाहता प्रकल्प पूर्णतेस विलंब होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कंत्राटदारावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे कंत्राटदाराला कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यात कारवाईचेही संकेत देण्यात आले आहेत.

houses, Mulund,
१४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

वांद्रे-वर्सोवा हे अंतर केवळ दहा मिनिटांत पार करता यावे यासाठी वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग बांधण्यात येत आहे. एकूण १७.१७ किमी लांबीच्या, आठ मार्गिकेच्या (येण्यासाठी ४-जाण्यासाठी ४) या मार्गाच्या बांधकामासाठी सात हजार  कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. काम सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही या प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी आल्याने कामाचा वेग सुरुवातीपासूनच मंदावला आहे. कास्टिंग यार्डचा प्रश्न प्रलंबित होता. मागच्या वर्षी हा प्रश्न एमएसआरडीसीने निकाली काढला, तर विविध प्रकारच्या परवानग्या घेण्यात विलंब झाल्यानेही प्रकल्पाला फटका बसला आहे. मात्र मागील काही महिन्यांत प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामाचा वेग वाढेल, असे वाटत होते. मात्र आजही काम संथगतीने सुरू आहे.

मागील दोन वर्षांत प्रकल्पाचे केवळ अडीच टक्केच बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याच वेगाने

काम होत राहिले तर प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणी १५ दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदारावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. कामाचा वेग का मंदावला याचे उत्तर द्यावे, अशी सूचना करतानाच याप्रकरणी आपल्या विरोधात कारवाई का करू नये, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अजून या नोटीसचे उत्तर कंत्राटदाराकडून सादर करण्यात आलेले नाही.  दरम्यान, येत्या काही दिवसांत कामाचा वेग वाढला नाही, तर नियमानुसार कंत्राटदाराविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याविषयी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्पाची कासवगती

याप्रकरणी आपल्या विरोधात कारवाई का करू नये, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अजून या नोटीसचे उत्तर कंत्राटदाराकडून सादर करण्यात आलेले नाही.

दरम्यान, येत्या काही दिवसांत कामाचा वेग वाढला नाही, तर नियमानुसार कंत्राटदाराविरोधात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याविषयी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.