मुंबई महानगरात मीटर बदलाचे काम संथगतीने

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होऊन एक महिना उलटून गेला असला तरी मुंबई महानगर परिसरात केवळ ७४ हजार वाहनांच्या मीटरमध्ये बदल करण्यात आला आहे. रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ १ मार्चपासून लागू होताच परिवहन विभागाने चालकांना मीटरचे रिकॅलिब्रेशन (बदल) करण्यासाठी मे अखेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे आता पुढील दोन महिन्यात बहुतांश रिक्षा टॅक्सीचे मीटर बदलावे लागणार आहेत. तोपर्यंत अन्य चालक हे नवीन दरपत्रक हाती घेऊन भाडेआकारणी करत आहेत.

परिवहन विभागाने १ मार्चपासून रिक्षाचे भाडेदर १८ रुपयांवरून २१ रुपये वाढवले आहेत, तर टॅक्सीचे भाडेदर २२ रुपयांवरून २५ रुपये केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मीटरमध्ये बदल करावा लागणार आहे.  हे काम १० मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मुंबईत सुमारे ५ लाख २० हजार रिक्षा आणि टॅक्सी आहेत. मात्र त्यांच्या मीटर रिकॅलिब्रेशनचे काम संथगतीने सुरू असून आतापर्यंत ७४ हजार रिक्षा टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करण्यात आला आहे. सध्या करोनामुळे कडक निर्बंध लागू केले असताना, तसेच सरकारी कार्यालयातील कर्मचारी संख्याही मर्यादीत केली असताना पुढील महिनाभरात सर्व वाहनांचे मीटर रिकॅलिब्रेशन करण्याचे आव्हान आरटीओ कार्यालयांसमोर आहे. त्याचबरोबर करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एकावेळी अनेक वाहनांची मीटर रिकॅलिब्रेशनसाठी गर्दी होऊ नये याची खबरदारीही आरटीओ कार्यालयांना घ्यावी लागणार आहे.

७१ हजार रिक्षांत भाडेबदल

सद्यस्थितीत मुंबई सेन्ट्रल, ताडदेव, अंधेरी, बोरीवली, ठाणे, कल्याण, पनवेल, वसई, नवी मुंबई, पेण या आरटीओत पासिंगसाठी रिक्षा, टॅक्सी येऊ लागली. मुंबई महानगरात ४ लाख ६० हजार रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी धावतात. आतापर्यंत ७१ हजार ६३० रिक्षा व २५८४ टॅक्सींच्या मीटरमध्ये सुधारित भाडे बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मुंबईत वडाळा आरटीओत सर्वाधिक २१ हजार ७७० रिक्षा आणि ८६८ टॅक्सींच्या मीटरमध्ये, अंधेरी आरटीओत ९ हजार ६६७ रिक्षा आणि बोरीवली आरटीओत ९ हजार ४८१ रिक्षा व ३५ टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल केले आहेत. तर ठाणे आरटीओत १९ हजार ७७२ रिक्षा, नवी मुंबई आरटीओत ९ हजार ८३६ रिक्षांच्या मीटरमध्ये बदल केले आहेत. त्याचबरोबर अन्य आरटीओतही मीटरमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चालकांचा प्रतिसाद थंड

मीटरमध्ये एक चीप बसवतानाच त्याची सव्‍‌र्हिसिंग आणि आरटीओ पासिंग यााठी  ७०० रुपये शुल्क चालकांकडून घेण्यात येते. मात्र, त्याचवेळी या प्रक्रियेसाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. त्यामुळे त्या दिवसाची कमाई बुडते शिवाय खर्चही करावा लागतो. त्यातच आता प्रवाशांच्या वाहतुकीवर निर्बंध आल्यामुळे उत्पन्न घटले असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळ एक दिवसाचे मिळणारे उत्पन्न बुडवून वर खर्च करणे परवडणारे नाही, असे चालकांनी सांगितले. रद्द करण्याचा समिती अध्यक्षांचा निर्णय रद्द ठरवला.

अध्यक्षांचा निर्णय बेकायदा आणि पदाचा दुरुपयोग करणारा असल्याचा आरोप शिरसाट यांनी याचिकेद्वारे केला होता. न्यायालयाने याचिकेवरील प्राथमिक सुनावणीच्या वेळी शिरसाट आणि पालिकेची बाजू ऐकल्यावर स्थायी समितीची बैठक घेण्यासाठी आणि शिरसाट यांचे सदस्यत्व कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय घेण्याची परवानगी दिली होती. त्याच वेळी शिरसाट यांच्याविरोधात निर्णय घेण्यात आला तरी निर्णयाची पुढील आदेशापर्यंत अंमलबजावणी केली जाऊ नये, असेही स्पष्ट केले होते. न्यायालयाने सोमवारी निकाल देताना न्यायालयाचा आधी दिलेला अंतरिम आदेश कायम केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 74 000 rickshaws taxis meter change zws
First published on: 06-04-2021 at 00:28 IST