मुंबई, ठाण्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांच्या शरीरात करोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज

परेल, भायखळयात राहणाऱ्या नागरिकांच्या शरीरात मोठया प्रमाणावर अँटीबॉडीज

प्रतिकात्मक छायाचित्र

राष्ट्रीय खासगी प्रयोगशाळेच्या डाटानुसार परेल, भायखळा या भागात रहाणाऱ्या नागरिकांच्या शरीरात मोठया प्रमाणावर कोविड-१९ अँटीबॉडीज आढळल्या आहेत. उपनगरात बोरीवली, साकीनाका आणि मुलुंड या भागातही सिरो पॉझिटिव्हीटी ३९ आणि ३८ टक्के आढळली आहे. मेट्रोपोलीस लॅबचे अध्यक्ष डॉ. निलेश शाह यांनी ही माहिती दिली. सिरो पॉझिटिव्हीटी शरीरात अँटीबॉडीज असल्याचे संकेत देते.

सध्याच्या दिवसात रुग्ण करोना मुक्त झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. करोना व्हायरस विरुद्ध लढण्यात या अँटीबॉडीज खूप महत्त्वाच्या आहेत. सध्या सुरु असलेल्या मानवी लस चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती किती प्रमाणात झाली, ते तपासले जाते. देशभरातील मेट्रोपोलीसच्या लॅबमध्ये चाचणी करणाऱ्या ४० हजार रुग्णांच्या डाटाचे विश्लेषण करण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

ठाणे आणि मुंबईत सिरो पॉझिटिव्हीटी अनुक्रमे ३५ आणि ३० टक्के आहे. म्हणजे या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या. दिल्लीत २७ टक्के, चेन्नई २६ टक्के आणि कोलकातामध्ये २० टक्के सिरो पॉझिटिव्हीटी रेट आहे. “२६ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान या चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत १६ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली” असे डॉ. निलेश शाह यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेने टीआयएफआर सोबत मिळून पहिला सिरो सर्वे केला होता. त्यात झोपडपट्टीत रहाणारे ५७ टक्के आणि अन्य भागात राहणाऱ्या १६ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले होते. मुंबईतील मेट्रोपोलीस लॅबचा डाटा बारकाईने तपासला तर, परेल आणि मौलाना आझाद मार्गावरील (भायखळा, मुंबई सेंट्रल) ४४ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Over 30 percent in mumbai thane have antibodies survey dmp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या