हयातीचा दाखलाही अॅपवरून स्वीकारणार
महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमान, स्वेच्छा सेवानिवृत्ती, मृत्यू, इत्यादी कारणांमुळे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना निवृत्तिवेतनादी फायदे मानव संसाधन प्रणालीतून आता ऑनलाइन मिळणार आहेत. यामुळे निवृत्तिवेतन दावा, भविष्य निर्वाह निधी दावा, उपदान दावा, रजा रोखीकरण यांचे विहित कालावधीत एकत्रित अधिदान करणे शक्य होईल. निवृत्तीच्या दाव्याची सद्य:स्थिती ई-मेल व एसएमएसद्वारे संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळू शकेल. तसेच मासिक निवृत्तिवेतनाची पावती ई-मेलद्वारे मिळेल. हयातीचा दाखला अॅपवरून स्वीकारता येईल.
सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजेच्या नोंदी प्रणालीत नोंदवणे व प्रणाली अद्ययावत ठेवणे ही बाब सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे. तसेच महानगरपालिके मध्ये ई-मस्टर प्रणाली कार्यान्वित झालेली असून ती वेतनाशी जोडली आहे. कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बदली, पदोन्नती, प्रति नियुक्ती, वेतनवाढ, निलंबन, कु टुंब सदस्य, नामनिर्देश, सर्व निवृत्तिवेतन बँकेची नोंद, निवृत्तीनंतरचा निवासाचा पत्ता इत्यादी बाबी प्रणालीत नोंदवण्यात येतात.
निवृत्तिवेतन दावा प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बऱ्याचदा जात पडताळणी विभागाचे अभिप्राय स्पष्ट नसतात. आस्थापना वसुली रजा प्रकरणे प्रलंबित असतात. त्यामुळे संबंधित विभागात दावे तयार के ले जात नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर नामनिर्देशन के लेले नसते. वेतननिश्चिती प्रपत्र दाव्यामध्ये जोडलेले नसते. गृहकर्जाचे
परिगणन के ल्यानंतर दावा संबंधित विभागात न पाठवता निवृत्तिवेतन विभागात पाठवला जातो; परंतु ना वसुली प्रमाणपत्रावर वसुलीची रक्कम नमूद केलेली नसते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध विभागांत वारंवार खेटे घालावे लागतात. ऑनलाइन प्रणालीमुळे हे कष्ट वाचणार आहेत.
