सोमवारच्या काहीशा विश्रांतीनंतर मंगळवारी परतलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक अडखळली. चेंबूर-गोवंडी या स्थानकांदरम्यान दुपारी दोनच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद झाली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होण्यास दीड तास लागला. तर मेन लाइनच्या गाडय़ा अकारण १५ ते २० मिनीटे उशिराने धावत होत्या.
मंगळवारी दुपारी चेंबूर आणि गोवंडी या स्थानकांदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे एकामागोमाग एक तीन गाडय़ा खोळंबल्या. परिणामी, या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वेने मानखुर्द-पनवेल, पनवेल-वाशी आणि कुर्ला-सीएसटी या मार्गावर एकूण आठ शटल सेवा चालवल्या. त्याचप्रमाणे पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या काही गाडय़ा ठाणेमार्गे पुढे नेण्यात आल्या.
दर्शनासाठी गेलेल्यांना ‘विश्वरूप दर्शन’
मुबंईतील ३०० यात्रेकरू उत्तरेत अडकून पडले आहेत. मात्र हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याचा दावा यात्रा कंपन्यांनी केला आहे.   
माहीम, वाकोला, भाईंदरमध्ये पडझड
वाकोला, गावदेवी येथील लसूणवाडीत भिंत कोसळल्याने  जखमी झालेल्या तीन लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.