मुंबई : हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’चे काम करण्यासाठी स्टॅबलिंग साइडिंग तीन आणि चारवर पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंगसाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. दररोज मध्यरात्री ब्लॉक घेऊन हे काम करण्यात येणार आहे. हा ब्लॉक अंदाजे ४५ दिवस असेल. या ब्लॉकमुळे रात्री १२.४० ऐवजी रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी ते पनवेल शेवटची लोकल धावेल. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

हेही वाचा >>> डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश…”

Nagpur, Kunal Battery,
नागपूर : कुणाल बॅटरीचा भरचौकात खून
139 passengers died after falling from the local train in three months
लोकलमधून पडून तीन महिन्यांत १३९ बळी ; रखडलेले प्रकल्प, मर्यादित फेऱ्यांमुळे जीवघेण्या प्रवासाची वेळ
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी

मध्य रेल्वेने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामांसाठी ४५ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉककाळात शेवटच्या पनवेल लोकल सेवेत बदल करण्यात आल्याने सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड दारावे, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल परिसरात राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी – पनवेल ही रात्री १२.२४ वाजता सुटणारी सीएसएमटी डाऊन लोकल वाशीपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल वाशी येथे रात्री १.१३ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे रात्री १२.४० वाजेची सीएसएमटी ते पनवेल डाऊन लोकल वाशीपर्यंत चालवण्यात येईल. ही लोकल वाशी येथे रात्री १.२९ वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने पहाटे ४.०३ वाजता सुटणारी पनवेल-सीएसएमटी अप लोकल वाशी येथून पहाटे ०४.३३ वाजता निघेल आणि पनवेल-सीएसएमटी अप लोकल पहाटे ४.२७ वाजता पनवेलहून सुटणारी लोकल पनवेलऐवजी पहाटे ०४.५७ वाजता वाशीहून निघेल.

हेही वाचा >>> “निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”, अमित ठाकरेंचा थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

याशिवाय, पहाटे ४.०३ वाजता सुटणारी पनवेल-सीएसएमटी अप लोकल वाशी येथून पहाटे ०४.३३ वाजता निघेल आणि दुसरी पनवेल-सीएसएमटी अप लोकल पनवेलहून पहाटे ४.२७ वाजता सुटेल. सीएसएमटीहून पनवेलसाठी रात्री १२.१३ ची सुटणारी शेवटची लोकल पनवेलला रात्री १.३३ वाजता पोहोचेल. पनवेल ते सीएसएमटी पहिली लोकल पहाटे ४.४९ वाजता सुटून सीएसएमटी येथे सकाळी ६.०८ वाजता पोहोचेल.