अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत स्वत:चे स्थान सुरक्षित केले. मात्र, ज्यापध्दतीने ही प्रक्रिया पार पडली त्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. याचा प्रत्यय बुधवारी सोशल मिडिया आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांची होणारी चर्चा यामधून येत आहे. मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या फेसबुक पेजवर एक आभाराचा फोटो अपलोड केला आहे. परंतु, त्यावर अभिनंदनाच्या कमेंट्सपेक्षा भाजपच्या कृतीचा निषेध करणाऱ्याच कमेंट्स अधिक प्रमाणात दिसत आहेत.
काही निवडक कमेंट्स;
– बीजेपी च्या चड्डीला
राष्ट्रवादीचा पट्टा
फसवून साऱ्या जनतेला
केली महाराष्ट्राची थट्टा
– ‘फडणवीसांचा’ लवकरच केजरीवाल होणार!!!
‘हो हे शक्य आहे’
फक्त ‘पवार साहेबांच्या धोरणांमुळे’.
– एकीकडे गुजरात मध्ये मतदान सक्तीचे करायचे…..
आणि महाराष्ट्रात आमदारांना मतदानच करू द्यायचे नाही….
अहो मोदीसाहेब कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…
– या गद्दारी ला महाराष्ट्रातील तमाम जनता उत्तर नक्की देणार
– फड़नवीस उखाना……… शिवसेनेन दिला मुक्का सरकार करण्याचा होता निर्धार पक्का पण शेवटी पवार च ठरले आमचे पप्पा
– आम्हा लोकांना राष्ट्रवादीचा पाठींबा रूचलेला नाही…
तुमच्याकडून खुप अपेक्षा आहेत
तडा जाऊ देऊ नका please…