छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार १८७५ मध्ये ब्रिटिश इंग्लंडला घेऊन गेले आणि सध्या ती तेथील रॉयल संग्रहालयात आहे. मात्र देशाचा अलौकिक वारसा असलेली ही तलवार परत आणण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाला द्यावेत, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश येथील स्टॅन्ली लुइस यांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी यासंदर्भात याचिका केली आहे. याचिकेत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्य प्रतिवादी केले आहे.  लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.