PMC बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आरबीआय चोर है च्या घोषणाही दिल्या. मुंबई हायकोर्टाबाहेर पीएमसीचे खातेदार जमले होते. हमारा पैसा वापस कर दो आरबीआय अशाही घोषणा देण्यात आल्या. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. अशात ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावलेत आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावेत यासाठी एक नियमावली करण्यात यावी अशी विनंती शिवसेनेने केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.

या सगळ्या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी पुढची दिशा काय असेल याची माहिती १३ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयात सादर करावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला दिला होता. त्यासंबंधीची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होईल असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. दरम्यान १९ नोव्हेंबरला म्हणजेच आज या प्रकरणाची सुनावणी ४ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली. हक्काचे पैसे खात्यातून काढता येऊ शकतील या आशेवर खातेदार होते. मात्र ही सुनावणी पुढे ढकलल्याने खातेदार संतापले आणि उच्च न्यायालयाच्या आवारातच आरबीआय विरोधात घोषणाबाजी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc bank account holders protest against rbi at high court scj
First published on: 19-11-2019 at 15:49 IST