गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले… शीतल तनु चपलचरण अनिलगण निघाले’ अशा शब्दांत पावसाळी वातावरणाचे अप्रतिम वर्णन करणारे कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता’ने बा. भ. बोरकर यांच्यावर प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवार, २७ जून रोजी होणार असून यानिमित्त ‘बाकीबाब’ या कार्यक्रमातून बोरकर यांच्या कवितांची मैफल रंगणार आहे.

‘लोकसत्ता’तर्फे नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. त्याच मालिकेत बा. भ. बोरकर यांच्यावरील विशेषांक प्रसिद्ध होत आहे. त्यात बोरकरांची कविता, साहित्य आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या नामवंतांचे लेख आहेत.

काही चित्रफिती, काव्यगायन, कवितांचे सादरीकरण आणि या सर्वांना एकत्र बांधणारे निवेदन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कार्यक्रम मोफत असून उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे. प्रवेशिका मंगळवारपासून उपलब्ध होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प) येथे सकाळी ९.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते ८ या कालावधीत प्रवेशिका मिळू शकतील.

कार्यक्रम : बाकीबाब!

कधी : शुक्रवार, २७ जून

कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर

केव्हा : सायंकाळी ६.00 वाजता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संहिता आणि सूत्रसंचालन : कुणाल रेगे