महालक्ष्मी मंदिराजवळ भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घालणाऱ्या दक्षिण मुंबईतील एका ४० वर्षीय महिलेवर गावदेवी पोलिसांनी पूजेच्या ठिकाणाची विटंबना आणि स्थानिक रहिवाशांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

स्थानिकांच्या अनेक तक्रारींनंतर मुंबई महापालिकेचे दोन पशुवैद्यकीय अधिकारी आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. या महिलेला भटक्या प्राण्यांना मांस न देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तिने या सूचनांचे पालन न केल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तिच्यावर धार्मिक स्थळाचे नुकसान करणे, अपवित्र करणे, शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यासह कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान

या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, “आम्ही अद्याप महिलेला अटक केलेली नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत, कारण तक्रारदाराने असा आरोप केला आहे की जेथे भाविक महालक्ष्मी आणि ढकलेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी रांगा लावत तिथे संबंधित महिला हेतुपुरस्सर रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घालते.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या शीला शहा यांच्या तक्रारीवरून नंदिनी बेलेकर आणि पल्लवी पाटील या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २९५ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाला इजा करणे किंवा अपवित्र करणे), २९५ (ए) (जाणूनबुजून आणि द्वेषपूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक विश्वासांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिर परिसरात भटक्या प्राण्यांना मांस खाऊ घातले

नंदिनी बेलेकर यांच्यावर महालक्ष्मी मंदिराजवळील रस्त्यांवर धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने मांस टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पाटील यांच्यावर तक्रारदार व इतर स्थानिक रहिवाशांना शिवीगाळ व धमकाविल्याचा आरोप आहे. या परिसरात महालक्ष्मी मंदिरासह अनेक मंदिरे असून २०२२ च्या सुरुवातीपासून स्वत:ला प्राणीप्रेमी म्हणवणारे बेलेकर मांजरी आणि कुत्र्यांना मटण, चिकन आणि मासे खाऊ घालत असल्याचा आरोप ६२ वर्षीय तक्रारदाराने केला आहे.

“असे भक्त आहेत जे अनवाणी मंदिरात जातात. त्यांना अनेकदा रस्त्यावर मांसाचे तुकडे दिसायचे, त्यामुळे महालक्ष्मी मंदिराभोवतीचा संपूर्ण परिसर अशुद्ध व्हायचा. आम्ही बेलेकर यांना एका ठिकाणी भटक्या जनावरांना चारायला सांगितले. परंतु, तरीही महिला मंदिराजवळील रस्त्यावर मासे आणि कोंबडीचे तुकडे फेकत असे”, शाह यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रकरणाची चौकशी करण्याकरता समितीची स्थापना

अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर समितीने ठरविले की, बेलेकर हे भटक्या जनावरांना ठराविक ठिकाणी रात्री १० नंतर खाऊ घालतील. तसंच, भटक्या प्राण्यांना मांस न देता त्यांना इतर पदार्थ खायला देण्याचेही निर्देश देण्यात आले होते. परंतु या निर्देशाचे पालन महिलेने केले नाही. परिणामी रहिवाशांना त्रास होऊ लागला. या प्रकरणाची तक्रार वाढल्याने बेलेकर यांनी पाटील यांना बोलावले. पाटील यांनी रहिवाशआंना शिवीगाळ केली. तसंच, त्यांच्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली.

शहा यांनी यापूर्वी बेलेकर यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “भटक्या जनावरांना खायला घालणे थांबले नसल्याने बेलेकर हे जाणूनबुजून प्रार्थनास्थळाची विटंबना करण्यासाठी आणि तिच्या धार्मिक भावना आणि इतर हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी करत असल्याची तक्रार शाह यांनी नोंदवली.” तसंच, पुरावा म्हणून तक्रारदाराने या प्रकरणाचे फोटोही पोलिसांना सादर केले आहेत.