Poonam Mahajan on Pramod Mahajan Death: मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाने यावेळी उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन या बराच काळ माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक मंचावर दिसल्या नव्हत्या. दोन वेळा या मतदारसंघातून खासदार झालेल्या पूनम महाजन यांचे तिकीट यावेळी कापण्यात आले. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली गेली. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. आता पूनम महाजन यांनी लोकसभेचे तिकीट कापल्याबद्दल आणि त्यांचे वडिल प्रमोद महाजन यांच्या हत्येबद्दल विविध दावे केले आहेत. इंडिय टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, आपले वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे काहीतरी गुप्त हेतू असावा. ही हत्या का झाली? याचा नव्याने तपास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पूनम महाजन काय म्हणाल्या?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूनम महाजन म्हणाल्या की, २००६ साली जेव्हा प्रमोद महाजन यांची हत्या झाली तेव्हा त्यांचा संशय जाहीरपणे बोलून दाखविण्यात त्या असमर्थ ठरल्या होत्या. पण वडिलांच्या हत्येबाबत त्यांनी वेळोवेळी संशय व्यक्त केला होता. आता आपला पक्ष केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी आपण करणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

हे वाचा >> Poonam Mahajan : “आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन प्रमोद महाजनांच्या आठवणींत भावूक

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख

पूनम महाजन पुढे म्हणाल्या की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची मुळापासून तपासणी करावी आणि सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करणार आहे. २२ एप्रिल २००६ साली वरळीतील निवासस्थानी प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रवीण महाजनने त्यांच्यावर गोळीबार केला होता. भांडण झाल्यानंतर प्रवीण महाजनने प्रमोद महाजन यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. ३० ऑक्टोबर २००७ साली प्रवीण महाजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी २०२२ साली पूनम महाजन यांनी वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे एक सूत्रधार असल्याचे म्हटले होते. या हत्येमागे केवळ कौटुंबिक वाद नाही, असाही संशय पूनम महाजन यांनी व्यक्त केला होता.