इस्रायल हमास युद्धाने जगाची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी इस्रायल हमास युद्धावर मोठं विधान केलं आहे. “इस्रायल हमास युद्धाने जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होईल की नाही माहिती नाही, पण भारतही त्यात अडकेल,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं. यावेळी आंबेडकर यांनी भारताने या युद्धात मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने पॅलेस्टिनला मदत केली पाहिजे, अशी मागणीही केली. ते बुधवारी (८ नोव्हेंबर) मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “इस्रायल हमास युद्ध हा खूप महत्त्वाचा विषय आहे. या युद्धाची व्याप्ती वाढली, तर तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होईल की नाही माहिती नाही, पण भारतही त्यात अडकेल. जगाला त्या भागातूनच कच्चे तेल (क्रुड ऑईल) पोहचते. आपण आधीच महागाईने ग्रासलो आहोत. आपण आधीच महागाईने ग्रासलो आहोत. अशावेळी कच्चा तेलाची किंमत वाढली, तर आपली अर्थव्यवस्थाही कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे.”

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा, म्हणाले, “मी आवाहन करतो की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात अडकला जाईल”

“भारत सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत, तर भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात अडकला जाईल. संकटकाळात भारत नेहमीच माणुसकीच्या दृष्टीने नेहमीच मदत करत असतो. त्यामुळे इस्रायल हमास युद्धात भारताने ती माणुसकीच्या दृष्टीने मदतीची भूमिका तरी पार पाडायला हवी,” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.