Precautionary alert across Mumbai after blast near Red Fort in Delhi : दिल्लीत आज (सोमवार) संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या स्फोटा किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत शहरात खबरदारीचा अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सणासुदीचा काळ आणि वर्षाचा शेवट जवळ येत असल्याने, मुंबई पोलीस आधीच सतर्क आहेत. एका अधिकार्‍याने माहिती दिली की, संपूर्ण शहरात सुरक्षा तपासण्या केल्या जातील.

एका वरिष्ठ मुंबई पोलिस अधिकऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “दिल्लीत झालेल्या घटनेबाबत आम्ही अद्याप अधिक स्पष्टता मिळण्याची वाट पाहात आहोत, पण खबरदारी म्हणून आम्ही शहरात अलर्ट जारी केला आहे आणि आमचे अधिकारी जमिनीवर कामाला लागले आहेत.” दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सणासुदीचा काळ नुकताच संपलेला असल्यामुळे आणि वर्षाचा शेवट जवळ येत असल्यामुळे मुंबई पोलीस आधीच सतर्क आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते प्रमुख जंक्शनवर तपासणी करतील आणि कोणत्याही संशयास्पद घटकांवर लक्ष ठेवतील. “आता प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी सेल आहे, जो त्यांच्या जंक्शनवर संशयित घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय केला जाईल,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त, राज्याचे दहशतवाद विरोधी पथक, फोर्स वन आणि इतर एजन्सीजदेखील सक्रिय करण्यात आल्या आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण शहरात लक्ष ठेवले जाईल.

आम्ही देखील शहराशी संबंधित कोणत्याही संभाव्य लिंकबद्दल सतर्क आहोत आणि जर आमच्याकडून कोणती मदत लागली तर म्हणून आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात राहू, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.