मुलुंडमध्ये एका रुग्णालयात उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंडमधील एमजी रोडवरील प्रसूतिगृहात डॉक्टर नसल्याने सोमवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी एका गर्भवती महिलेचा कथितरित्या मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुलुंडमधील भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी मुलुंड पोलिसांकडे तक्रार दाखल करत या टोकाच्या निष्काळजीपणाबाबत रुग्णालयाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजपा आमदाराने बीएमसीला देखील याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे. दरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासणीनुसार २६ सप्टेंबर रोजी कन्सल्टेशनसाठी एमटी अग्रवाल रुग्णालयात आलेल्या २६ वर्षीय महिलेला दोन दिवस ताप आला होता. त्यानंतर, त्यांना रक्त तपासणीचा सल्ला देण्यात आला आणि लक्षणात्मक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना २७ सप्टेंबर रोजी मुलुंड प्रसूती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर उपचार करण्यात आले आणि रक्त तपासणीचे अहवालही पाठवण्यात आले. मात्र, एकीकडे त्यांचा ताप कमी होत असताना संध्याकाळी ७ च्या सुमारास अतिसाराचा त्रास होऊ लागला. म्हणून, डॉक्टरांनी त्यांना सावरकर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नसल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित गर्भवती महिलेला त्यानंतर नायर रुग्णालयात हलवण्याचा देखील निर्णय झाला. परंतु, त्यावेळी देखील त्यांचे नातेवाईक पुन्हा ‘नॉट रिचेबल’ होते. पुढे, अखेर या महिलेला सावरकर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि पहाटे ३.२२ मिनिटांनी या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.