यंदा दिवाळीत खासगी प्रवासी बसने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात जायचे असल्यास खिशाला मोठी कात्री लागणार आहे. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी भाडेवाढ केली असून दिवाळीत मुंबई-नागपूर वातानुकूलित शयनयान (स्लीपर बस) प्रवासासाठी चार हजार ते पाच हजार रुपये तिकीट दर निश्चित केले आहेत. सध्या हेच दर १५०० ते १८०० रुपये आहेत. गेल्या दोन वर्षात दिवाळीत खासगी प्रवासी बसने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या कमी होती. यावेळी प्रवासी संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविला असून त्यामुळे तिकीट दरात वाढ झालली आहे.

हेही वाचा- मेट्रो ४ आणि ४ अ च्या कामाला गती, आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण

करोनाच्या साथीमुळे २०२० आणि २०२१ मध्ये गणेशोत्सव आणि दिवाळीत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह अन्य भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली होती. यावेळी करोना संसर्ग अत्यंत कमी असून निर्बंधही नाहीत. त्यामुळे यावेळी दिवाळीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गर्दीच्या काळात शासनाने एसटी भाडेदराच्या दीडपट भाडे आकारण्याची मुभा खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात दुप्पटीपेक्षाही अधिक दर आकारण्यात येतात.

हेही वाचा- ‘झोपु प्रकल्पांच्या संयुक्त तपासणीला विरोध नाही’; न्यायालयाने फटकरल्यानंतर किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी असून त्यापूर्वी १८ ऑक्टोबरपासूनच खासगी प्रवासी बस वाहतूकदारांनी भाडेदरात वाढ़ केली आहे. आता दिवाळीतील खासगी प्रवासी बसचे तिकीट काढण्यासाठी गेल्यास अव्वाच्यासव्वा किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. मुंबई-कोल्हापूर प्रवासही महागला असून वातानुकूलित शयनयान बसचे ८०० रुपये असलेले तिकीट दर दिवाळीत दोन हजार रुपये, तर आसन प्रकारातील वातानुकूलित बसचे दरही ५०० रुपयांवरून १२०० ते १५०० रुपये झाले आहेत. मुंबई-औरंगाबाद वातानुकूलित शयनयान प्रवासासाठीही दोन हजार रुपये मोजावे लागणार असून सध्या हेच दर 650 ते 700 रुपये आहेत. याच मार्गावर विना वातानुकूलित आसन बसचे तिकीटही ४०० ते ५०० रुपयांऐवजी १२०० ते १३०० रुपये झाले आहे. सिंधुदुर्गसाठीही वातानुकूलित शयनयान बसचा प्रवास २३०० ते तीन हजार रुपये झाला असून सध्या याच प्रवासासाठी १२०० रुपये मोजावे लागतात.