कांदिवली येथील ठाकूर संकुल परिसरात ३८ वर्षे वयाच्या व्यावसायिकाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघड झाली. नैराश्यातून सदर व्यावसायिकाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
रामजीभाई गागल असे या व्यावसायिकाचे नाव असून तो गुजरातमध्ये वास्तव्याला आहे. मुंबईत बहिणीकडे दोन महिन्यांपूर्वी तो आला होता. रविवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ठाकूर संकुलातील गार्डन यार्ड या टॉवरच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. पत्नीला दोन वर्षांपूर्वी घटस्फोट दिल्यानंतर त्याला नैराश्य आले होते. गागल याचा गुजरातमध्ये कपडय़ांचा व्यवसाय आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2013 रोजी प्रकाशित
कांदिवली येथे व्यावसायिकाची आत्महत्या
कांदिवली येथील ठाकूर संकुल परिसरात ३८ वर्षे वयाच्या व्यावसायिकाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघड झाली. नैराश्यातून सदर व्यावसायिकाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
First published on: 11-02-2013 at 02:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professional cumitted suicide at kandivali