‘वृत्तांकनास मनाई केल्यास प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा’

शिल्पाची ही मागणी धोकादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले.

शिल्पा शेट्टीची मागणी फेटाळली

मुंबई : मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेली मागणी मान्य करून प्रसिद्धीमाध्यमांना वृत्तांकन करण्यापासून सरसरकट मज्जाव केला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले. त्याचवेळी माध्यमांचे स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराशी संतुलित असणे आवश्यक असल्याचेही म्हटले.

पत्रकारिता ही अभिव्यक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे चागंली आणि वाईट पत्रकारिता कशाला म्हणावे याबाबत न्यायालयालाही मर्यादा आहेत, असेही न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले. मानहानीकारक वृत्तांमुळे झालेल्या मानसिक त्रासासाठी शिल्पाने २५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची तसेच समाजमाध्यमे व संकेतस्थळांनी प्रसिद्धीमाध्यमांतील वृत्तांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली होती. परंतु शिल्पाची ही मागणी धोकादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले.

अश्लिल चित्रपट निर्मितीप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून प्रसिद्धीमाध्यमांकडून आपल्याविरोधात मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केली जात असल्याचा आरोप शिल्पाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prohibition on reporting is a blow to the expression of the media akp