११ वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडण्याच्या आरोपांप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध नव्याने खटला चालवण्याला लवकरच सुरुवात होणार आहे. सरकारी पक्षाने या खटल्यामध्ये ६४ लोकांची साक्ष नोंदविण्याचे निश्चित केले असून, त्यांच्या नावांची यादीच न्यायालयाकडे सादर करण्यात आली आहे.
सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्याकडे सरकारी पक्षाने साक्षीदारांची यादी दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी सरकारी पक्षाला आरोपीविरुद्ध आणखी काही कागदपत्रे जमा करायची आहेत का, याचीही विचारणा न्यायालयाने केली.
सलमानने त्याच्याकडील टोयोटा लॅंड क्रुझर ही गाडी बेदरकारपणे चालवून पदपथावर झोपलेल्या लोकांना चिरडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि चौघेजण जखमी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
‘हिट अॅंड रन’प्रकरणी सलमानविरोधात ६४ साक्षीदारांची नावे न्यायालयाकडे
११ वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडण्याच्या आरोपांप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध नव्याने खटला चालवण्याला लवकरच सुरुवात होणार आहे.
First published on: 22-01-2014 at 04:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prosecution to examine 64 witnesses against salman khan