‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’तर्फे सोमवार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ‘रिझव्र्ह बँके’चे गव्हर्नर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने लघु-मध्यम उद्योजकांना ललित दोशी स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’ आणि ‘एमआयडीसी’तर्फे अमरावतीमधील ‘जाधव गिअर प्रा. लि.’ आणि अकोला येथील ‘अक्षय केमिकल्स’ या उद्योगांना ललित दोशी स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर ‘फायनान्शिअल सेक्टर रिफॉम्र्स-अॅचिव्हमेंट, प्रॉस्पेक्ट्स अॅण्ड चॅलेंजेस’ या विषयावर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘ललित दोशी स्मृती फाऊंडेशन’तर्फे रघुराम राजन यांचे व्याख्यान
‘ललित दोशी मेमोरिअल फाऊंडेशन’तर्फे सोमवार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ‘रिझव्र्ह बँके’चे गव्हर्नर रघुराम राजन यांचे व्याख्यान होणार आहे.
First published on: 11-08-2014 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan lecture in mumbai