रविवारपासून मुंबईतला पाऊस ओसरला असला तरी बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्य़ात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर ठाणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी सांताक्रूझ येथे ९.१ मिमी पावसाची नोंद झाली, तर संध्याकाळी केवळ ०.६ मिमी पाऊस झाला.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्टय़ामुळे विदर्भातील बहुतांश भागांत बुधवारी ७ आणि गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी जोरदार पावसासह तापमानात घट होण्याचा अंदाज असून उद्या पूर्व विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होईल. उर्वरित विदर्भात हलका पाऊस राहील. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्य़ांत ८ आणि ९ ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.