मुंबई : गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीच्या आवाजाच्या कर्कश पातळीमुळे हृदय बंद पडणे, बहिरेपणा, लेझरमुळे दृष्टीवर परिणाम असे प्रकार चिंताजनक असून कोणतेही उत्सव भान ठेवून साजरे व्हायला हवेत, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले आहे. उत्सवातील बीभत्सपणा आणि उन्माद रोखण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा >>> “आता काँग्रेसकडून सीपीआयचा प्रवक्ता म्हणून वापर, येचुरी…”; वंचितचा काँग्रेसवर हल्लाबोल

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीच्या आवाजच्या कर्कश पातळीमुळे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोक निघून जातात; पण पोलीस किंवा इतर कर्मचारी तसेच त्या भागात राहणारे रहिवासी यांची अवस्था गंभीर होते, असे सांगत राज ठाकरे यांनी उत्सवातील गोंगाटावर नाराजी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका बाजूला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे सार्वजनिक उत्सवात बीभत्सपणा वाढत आहे. – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे