माहितीच्या अधिकाराचा वापर करून बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकास नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री उथळसर भागात सापळा रचून अटक केली.
किरण महादेव वैद्य (४०), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो वर्तकनगर येथील कोरस टॉवरमध्ये राहतो. शहरातील एका व्यावसायिकाकडे त्याने सहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील दीड लाखांचा पहिला हप्ताही त्याने घेतला होता. दरम्यान, गुरुवारी दुसरा हप्ता घेण्यासाठी तो उथळसर भागात आला होता. मात्र, या संदर्भात व्यावसायिकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
ठाण्यात खंडणीखोरास सापळा रचून अटक
माहितीच्या अधिकाराचा वापर करून बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकास नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री उथळसर भागात सापळा रचून अटक केली.
First published on: 14-12-2012 at 03:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ransom demander arrested in thane