मुंबई : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल अशा चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दिवाळीपूर्वी चांगल्या दर्जाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागास केली. 

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने १०० दिवसांच्या कारभाराचे औचित्य साधून गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सुमारे ३०० रुपयांच्या या वस्तू १०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. सरकारतर्फे दिवाळी भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या या संचामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या अंत्योदय व अन्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर पामतेल यांचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी ५१३ कोटी २४ लाख रुपये खर्च केले करण्यात येणार आहेत.

What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
nagpur, vidarbha, Cooler, Electric Shock, Rising Cases, Tips, Prevent, summer, heat, marathi news,
तुमच्याकडे कूलर लागलाय का?, मग ‘हे’ वाचाच….
mumbai, mhada, judges houses, 9500 per square feet
म्हाडा भूखंडावरील न्यायाधीशांचे घर प्रति चौरस फूट साडेनऊ हजार रुपये!

निविदेला वित्त विभागाचा आक्षेप

अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५० ते ३०० रुपयांत या वस्तू देण्याचा प्रस्ताव दिला होता. विभागाने वस्तू वायदे बाजाराच्या माध्यमातून शनिवारी यासाठी ई-निविदा मागवली आणि सोमवारी हे काम ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह कंझुमर्स फेडरेशन लि.’ यांना २७९ रूपये या दराने देण्याचा निर्णय घेतला. वित्त विभागाने मात्र या निर्णयास आक्षेप घेतला असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाने खुल्या बाजारातील स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून स्पर्धात्मक दराने दर निश्चिती करावी. तसेच विभागाने सादर केलेला रव्याचा प्रति किलो ८० रुपये हा दरही बाजारभावाच्या तुलनेत अधिक असल्याने ही खरेदी करताना वस्तूंचे दर घाऊक बाजारभावापेक्षा कमी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर ही योजना राबविण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने वायदे बाजारातून खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या भूमिकेवर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याचे समजते. मात्र, या शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नयेत, याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.