मुंबई : समाजमाध्यमांवर दर काही दिवसांनी नवनवीन फॅशन ट्रेंड डोकावतो. सध्या एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या लाल साडीतील फोटोची तरुणींना भुरळ पडली असून सर्वजण लाल साडीतील फोटो समाजमाध्यमांवर टाकत आहेत. गुगल जेमिनी या एआय आधारित ॲपवरून काही सेकंदांतच आकर्षक फोटो तयार करून मिळत असून त्यात हवा तसा त्यात बदल करता येतो. ॲपमध्ये केवळ योग्य सूचना देणे गरजेचे असते.
पूर्वी पारंपरिक पोशाखात फोटोशूट करण्यासाठी स्टुडिओ, मेकअप कलाकारकिंवा छायाचित्रकराची मदत घ्यावी लागत असे. मात्र, आता एआय तंत्रज्ञानामुळे त्यावर खर्च करण्याची तसेच, वेळ द्यायची गरज भासत नाही. केवळ एक साधा फोटो अपलोड केला की काही सेकंदातच आकर्षक फोटो तयार करून मिळत असल्याने अनेकजण या पद्धती वापरत आहेत. गुगल जेमिनी या ॲपमध्ये हवे तसे कपडे, दागिने, आकर्षक पार्श्वभूमी आणि हव्या तशा पोझची सूचना द्यायची. त्यांनतर लगेच आकर्षक फोटो तयार करून दिला जातो. तसेच, फोटो एआयच्या मदतीने तयार केला की खरा आहे, असा संभ्रम निर्माण होतो. फॅशन क्षेत्रात लाल रंगाला विशेष महत्व आहे. लग्नसोहळा, सण किंवा विशेष प्रसंगी महिलांना विविध प्रकारातील लाल साड्या परिधान करणे आवडते. त्यामुळे एआय फोटोमधील हा लूक आणखी लोकप्रिय ठरला आहे. आतापर्यंत फेसबुक, इंस्टाग्रामवर हजारो तरुणींनी हा ट्रेंड फॉलो केला असून आता अन्य विविध पेहरावातील फोटोही टाकले जात आहेत. त्यात नवरात्रीतील चानिया चोली, सुताची साडी, ९० च्या दशकातील लूक लोकप्रिय ठरत आहेत. सर्वच वयोगटातील महिलांना आता या एआय आधारित फोटोंची भुरळ पडली आहे.
‘एआय सारी लूक’, ‘लाल सारी ट्रेंड’, ‘गुगल जेमिनी’, ‘फॉलो द ट्रेंड’ आदी विविध हॅशटॅगसह स्वतःचे फोटो टाकून तरुणी फॉलोअर्सची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी जिबिली आर्ट हा नवीन ट्रेंड समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाला होता. या ट्रेंडनेही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते.
लाल साडीतील लूक कसा तयार करावा?
- गूगल जेमिनी या ऍपवर चेहेरा स्पष्ट दिसणारा फोटो अपलोड करा. ज्या पद्धतीचा फोटो हवा, तशी प्रॉम्प्ट (सूचना देणे) टाईप करा. त्यानंतर काही सेकंदातच फोटो तयार…
वायरल लाल साडीतील ट्रेंडसाठी कोणता प्रॉम्प्ट?
Create a retro vintage bright image of the reference picture but draped in a perfect turquoise color Pinteresty aesthetic retro saree. It must feel like a 90s movie dark brown hair baddie with a small flower tucked visibly into her curls and romanticising windy environment. The girl is standing against a solid wall deep shadows and contrast drama, creating a mysterious and artistic atmosphere where the lighting is warm with a golden tones of evoking a sunset or golden hour glow. The background is minimalist and slightly textured the expression on her face is moody, calm yet happy and introspective