मुंबई : काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास  करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. 

काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन या परिसराची पाहणी केल्यानंतर शिंदे बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री दीपक सावंत, राज पुरोहित आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 मुंबादेवी प्राचीन मंदिर असून याप्रति सर्वानाच श्रद्धा, आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर, तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. त्याचा विचार करता लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.