रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना राज्यात या इंजेक्शनचा काळा बाजार झाल्याचा आरोप केला जात आहे. खासगी पातळीवर रेमडेसिवीरचा वापर करण्यावर बंदी असताना भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर आणि नंदुरबारमध्ये रेमडेसिवीर वाटलेच कसे? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांवर आणि ब्रुक्स फार्मा कंपनीवर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शिरीष चौधरी यांनी मात्र आरोपांनंतर उलट सवाल केला आहे. “नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवेमुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यांना आम्ही इंजेक्शन पुरवले, तर काय गुन्हा केला?” असा सवाल चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात नेमका कधीपासून लॉकडाउन लागू होणार? परिवहनमंत्री अनिल परब यांची दिलं स्पष्टीकरण!

भाजपा नेते आणि ब्रुक्स फार्माचं संगनमत!

दरम्यान, काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी शिरीष चौधरींच्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटण्यावर आक्षेप घेतला आहे. “इंजेक्शन चोर भाजपा आणि ब्रुक्स फार्माच्या प्रमुखांवर आम्ही कारवाईची मागणी करतो आहोत. या दोघांचाही रेमडेसिवीरच्या काळा बाजार करण्यामध्ये हात होता आणि त्यांचं संगनमत होतं हे आता स्पष्ट होत आहे. ज्या प्रकारे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांनी नौटंकी करण्याचा प्रयत्न केला तो आता उघडा पडला आहे. त्यांनी नौटंकी करण्याआधीच मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा साठा भाजपा नेत्याच्या माध्यमातून जनतेमध्ये वाटला गेला आणि त्यासाठी लोकांकडून पैसे देखील उकळले गेले आहेत”, असं सावंत म्हणाले आहेत.

नेमका आक्षेप काय?

दरम्यान, ब्रुक्स कंपनीने राज्य सरकारला नकार दिलेला असताना, एफडीएची थेट औषधे वाटण्यासाठी परवानगी नसताना रेमडेसिवीर इंजेक्शन वाटलेच कसे गेले? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

“८ आणि १२ एप्रिलला भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर आणि नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर वाटून लोकांकडून पैसे उकळले आहेत. या सगळ्या व्यवहारामध्ये ब्रुक फार्माचे लोकं देखील सहभागी आहेत. कारण ब्रुक फार्माने राज्य सरकारला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीर देऊ शकत नाही कारण दमणच्या प्रशासनाने आमच्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रानं देखील खासगी पातळीवर रेमडेसिवीर द्यायला बंदी घातली आहे. असं असताना राज्यात हा साठा कसा आला? ब्रुक फार्माने तो कसा दिला? याचीही चौकशी करण्याची गरज आहे. एफडीएची परवानगी नसताना औषधाचं वाटप अशा पद्धतीने केलं गेलं आणि स्वत:ची प्रसिद्धी केली गेली. लोकांकडून पैसे घेतले गेले. हे अत्यंत भयानक आहे. तात्काळ भाजपाचे नेते आणि ब्रुक फार्माच्या प्रमुखांवर कारवाई व्हायला हवी आहे”, असं सावंत म्हणाले.

More Stories onकरोनाCorona
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remdesivir supply in maharashtra congress sachin sawant slams shirish chaudhari pmw
First published on: 20-04-2021 at 22:13 IST