मुंबईः पिस्तूलचा धाक दाखवून नोकराचे दोन्ही हात, पाय बांधून कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा मिळून सुमारे ४० लाख रुपयांचा ऐवज लुटून पळून गेलेल्या मुख्य आरोपीसह तिघांना ४८ तासांमध्ये अटक करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले. देवेश प्रेमचंद सवासिया, मुस्तकीन ऊर्फ सोहेल रहिम शेख आणि सर्वेश कल्लू शर्मा अशी अटक आरोपींची नावे असून सर्वेश हा कंत्राटदार आहे. त्यानेच या कटाची योजना बनविल्याचे तपासात उघड झाले. या आरोपींनी लुटलेली रोकड आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केले. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोरेगाव येथील ओशिवरा बस डेपोजवळील धीरज अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली. या अपार्टमेंटच्या १२ व्या मजल्यावरील सदनिकेत संतोष रविशंकर गुप्ता त्यांचा नोकर विकास चौधरीसोबत राहतात. संतोष बॉलीवूडशी संबंधित असून त्यांनी एका वेबसिरीजची निर्मिती सुरू केली होती. विकास त्यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून काम करीत असून तो झारखंडमधील रहिवाशी आहे. रविवार, ८ जानेवारी रोजी संतोष त्याचा मित्र अजयसिंग राठोडसोबत मिरारोड येथे एक सदनिका पाहण्यासाठी गेले होते. यावेळी विकास घरी होता. त्यावेळी त्यांच्या घरी दोन तरुण आले.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच

हेही वाचा >>> कारागृहातून बाहेर येताच गुंडाने केला खून, उपराजधानीत दर दुसऱ्या दिवशी हत्याकांड

या दोघांनी संतोष गुप्ता यांची चौकशी करून सदनिकेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच या दोघांनी विकासला पिस्तूलचा धाक दाखवला आणि त्याचे हात, पाय बांधले. त्याच्याकडून कपाटाची चावी घेतली आणि कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते पळून गेले. या घटनेची माहिती विकासने तात्काळ संतोष गुप्ता यांना दिली. त्यानंतर ते तातडीने घरी आले. संतोष यांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध ३९२, ४५४, ३८०, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी मिळालेली तांत्रिक माहिती आणि सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी देवेश आणि मुस्कीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सर्वेशने हा कट रचल्याचेही चौकशीत उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सर्वेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सर्वेश हा कंत्राटदार असून त्याने संतोष गुप्ता यांच्या घरी काम केले होते. दीड महिना तो त्यांच्यासोबतच राहात होता. यादरम्यान या दोघांची त्याच्यासोबत चांगली ओळख झाली होती. संतोष बॉलीवूडशी संबंधित असल्याने त्याच्या घरी नेहमीच लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार होत होते. याची त्याला कल्पना होती. त्यामुळेच त्याने देवेश आणि मुस्तकीनच्या मदतीने त्यांच्या घरी चोरीची योजना आखली होती.