कचऱ्याच्या प्रश्नावरून पालिकेत पुन्हा एकदा रणकंदन झाले असले तरी नजिकच्या काळात मुंबईकरांची दरुगधीपासून सुटका नाही. कचऱ्यावर उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पालिका प्रशासनाला आणखी किमान एका वर्षांचा कालावधी लागेल. अनेक दिवस कचरा रस्त्यावर पडून राहत आहे. पावसामुळे तो कुजून आजार पसरत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी सोमवारी सभागृहात उपस्थित केला. सर्व नगरसेवकांनी या मुद्याला पाठिंबा दिला. मुंबईतील अनेक भागांत कचरा साठून राहत असल्याने पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी झोड उठवली. या प्रश्नाला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर पाटणकर यांनी यापुढे प्रत्येक घरातून कचरा उचलण्याचा तसेच ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस असल्याचे सांगितले. मार्च २०१४ पर्यंत प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्याचा प्रकल्प राबवला जाईल व त्यानंतर मार्च २०१५ पर्यंत ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे बंधन घालण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र या उत्तरावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी गोंधळ घातल्याने म्हैसकर यांनी उत्तर पूर्ण करता आले नाही.
अनेक दिवस कचरा उचलला जात नाही, कचरा गाडय़ांची अपुरी संख्या तसेच क्षमता संपलेली डम्पिंग ग्राऊंड यामुळे कचरा उचलण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा पालिकेत आला आहे. त्यावर डम्पिंग ग्राऊंडची क्षमता वाढवणे, डम्पिंग ग्राऊंडसाठी नवी जागा शोधणे, कचरा गोळा करण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवण्याचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र त्यापैकी कोणत्याही बाबतीत पालिकेला गेल्या काही वर्षांत यश आलेले नाही. पालिका प्रशासनाकडून सोमवारी सांगण्यात आलेले आश्वासन पाळले गेले तरी वर्षभर कचऱ्याच्या दरुगधीपासून मुंबईकरांची सुटका नाही.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2013 रोजी प्रकाशित
पालिकेत गोंधळाची दरुगधी!
कचऱ्याच्या प्रश्नावरून पालिकेत पुन्हा एकदा रणकंदन झाले असले तरी नजिकच्या काळात मुंबईकरांची दरुगधीपासून सुटका नाही. कचऱ्यावर उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पालिका प्रशासनाला आणखी किमान एका वर्षांचा कालावधी लागेल. अनेक दिवस कचरा रस्त्यावर पडून राहत आहे. पावसामुळे तो कुजून आजार पसरत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी सोमवारी सभागृहात उपस्थित केला.

First published on: 16-07-2013 at 02:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Row over clean up project in bmc