करोनाचा मुकाबला करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असलेले अधिकृत फे रीवाले व पथविक्रे ते, तसेच घरकाम करणाऱ्या गृहसेविकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा राज्यातील ४ लाख फे रीवाले व एक लाख गृहसेविकांना लाभ मिळणार आहे.  राज्य शासनाने त्यासंबंधीचे दोन स्वतंत्र आदेश जारी करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रशद्ब्रा निर्माण झाला आहे. त्याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंधामुळे रोजीरोटीला मुकावे लागणाऱ्या घटकाला आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा के ली होती. त्यानुसार राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांच्या हद्दीतील  फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १५ एप्रिलपर्यंत पंतप्रधान स्वनिधी योजनेत अर्ज के लेल्या ४ लाख ११ हजार ७४५ अधिकृत पथविक्रे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ६१ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी (२९ एप्रिल) तसा शासन आदेश काढला आहे. घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या गृहसेविकांनाही करोना टाळेबंदीचा फटका बसला आहे. त्यांनाही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदित असलेल्या व नूतनीकरण झालेल्या १ लाख ५ हजार ५०० गृहसेविकांना प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये वितरित करण्यास कामगार विभागाने मान्यता दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 1500 assistance to housemaids abn
First published on: 01-05-2021 at 00:50 IST