मुंबई : वाहतूक नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांकडून ई-चलन दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी राज्यातील ६ लाख ७९ हजार ६७५ वाहनधारकांना लोकअदालतमार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंतची थकीत एकू ण १०३ कोटी ३८ लाख रुपयांपैकी २२ कोटी ७७ लाख १९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी राज्यात ई-चलन पद्धत अमलात आणण्यात आली. त्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात सीसीटीव्हींमार्फत कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रथम मुंबईत याद्वारे कारवाईला सुरुवात केल्यानंतर राज्यातील सर्वच भागांत त्याची व्याप्ती वाढवली. ई-चलनद्वारे झालेला दंड भरण्यास चालकांचे दुर्लक्ष आणि त्याची वसुली करण्यास वाहतूक पोलिसांसमोरही असलेल्या अडचणींमुळे राज्यात २०१९ पासून ते सप्टेंबर २०२१ पर्यंत दंडाची थकीत रक्कम एक हजार १९ कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाली आहे.

आता दंडवसुलीला वेग देण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी लोकअदालतमार्फत वसुली के ली जात आहे. या अदालतमध्ये जाऊन दंड कमी करून तो भरण्याचा पर्यायही उपलब्ध के ला आहे. तसेही न  के ल्यास त्या वाहनधारकाला नोटीस बजावून दंड भरण्याची ताकीद दिली जात आहे. अशा तऱ्हेने १३ सप्टेंबरपासून लोकअदालतमार्फत राज्यातील ६ लाख ७९ हजार ६७६ वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या वाहनधारकांवर एकू ण जवळपास २१ लाख २० हजार ९८३ ई-चलन बनले आहेत. एका वाहनचालक किंवा धारकावर वाहतूक नियम मोडल्याचे एक किं वा त्यापेक्षा जास्त ई-चलन करण्यात आले आहेत.

अशांकडून जानेवारी २०२१ पासून १०३ कोटी ३८ लाख ३७ हजार रुपये दंड येणे बाकी होते. सप्टेंबरमध्ये नोटीस पाठविल्यानंतर २२ कोटी ७७ लाख १९ हजार १०० रुपये दंड वसूल झाला आहे.

मुंबईत सर्वाधिक नोटिसा

मुंबई शहरात सर्वाधिक २ लाख १४ हजार ७९३ वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. जवळपास ९ लाख ३७ हजार ७५५ ई-चलनचे ३५ कोटी ३९ लाख १४ हजार ४०० रुपये दंड प्राप्त झाला नव्हता. आता १ लाख ५० हजार ८१७ ई-चलनची ५९ लाख ६४ हजार रुपये दंड वसूल झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पुणे शहरातही १ लाख ५२ हजार ६५१ वाहनधारकांना नोटीस पाठविली असून २६ कोटी १३ लाख ४० हजार रुपये दंडापैकी ६ कोटी ३३ लाख ४१ हजार १०० रुपये दंड वसूल के ला आहे. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे शहर, पुणे ग्रामीण, नाशिक शहर, नागपूर शहरातही सर्वाधिक वाहनधारकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 22 crore fine recovered from vehicle owners for violating traffic rules in maharashtra
First published on: 01-11-2021 at 02:12 IST