हिंदुस्थान प्रकाशन संस्था’ या संघ परिवाराशी संबंधित संस्थेचे मुंबईतून प्रसिद्ध होणारे ‘विवेक’ हे साप्ताहिक, संघ परिवाराचे मराठी मुखपत्र म्हणून ओळखले जाते. ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण: शिल्पकार चरित्रकोश’ या नावाचे बारा खंड प्रकाशित करण्याचा एक प्रकल्प ‘विवेक’ने हाती घेतला असून त्यापकी सात खंड प्रसिद्ध झाले आहेत. या खंडांसाठी राज्यातील काही संस्थांचे प्रायोजकत्वही लाभले आहे. मात्र या प्रकल्पासाठी विवेकला पाच कोटींचा निधी देण्याचा एक प्रस्ताव या बठकीत चच्रेला आल्याने सदस्यांच्या भुवया उंचावल्या.
मंडळाचा एकूण डोलाराच जेमतेम दीड कोटींचा असताना हा निधी कसा देणार, असा प्रश्नही काही सदस्यांनी विचारल्याचे कळते. शिवाय, विवेकच्या प्रकल्पासाठी प्रायोजकांचे अर्थसाहाय्य मिळत असताना त्यासाठी मंडळाने निधी देणे प्रशस्त ठरणार नाही, असा सूर या बठकीत लावला गेला. राज्याच्या विश्वकोश मंडळाकडे हा प्रस्ताव वर्ग करावा, असेही काही सदस्यांनी सुचविले. मात्र िहदुस्तान प्रकाशन संस्थेशी संबंधित व्यक्ती या मंडळावर असल्याने तसे योग्य होणार नाही असा समंजस विचार पुढे आला आणि संघाच्या मुखपत्रास निधी देण्याचा प्रस्ताव मागे ठेवावा लागला, असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss magazine vivek get 5 crore rs fund
First published on: 08-09-2015 at 03:22 IST