श्री. सचिन रमेश तेंडुलकर, वय ४०. अशी शिधापत्रकी नोंद केवळ एखादा अरसिकच करू शकेल. मात्र सचिनसारख्या जित्याजागत्या दंतकथेला वय नसते! सचिन ज्या उमेदीने, ज्या जिद्दीने खेळपट्टीवर उभा असतो, त्या जिद्दीला वय नसते! अब्जावधी क्रिकेटरसिकांच्या मनावर राज्य करीत असलेले सचिन नावाचे गारूड चिरतरुणच असते. मग भलेही आज तो चाळीशीचा टप्पा पार करीत असो, निवृत्तीच्या सोपानावर उभा असो. ज्याने आजही आपली बॅट फिरवताच मैदानावर झंझावात उठते, त्या सचिन नावाच्या महानायकाला हा शाब्दिक सलाम..!!!