महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या त्यांच्या नव्या घरात शिवतिर्थ याठीकाणी वास्तव्याला आहेत. दरम्यान, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. हे दोघे घरातील गॅलरी उभे असताना अनेकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले. 

दिवाळी सणाच्या निमित्ताने भाऊबीजेच्या शुभमुहुर्तावर राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. त्यांचं आधीचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज शेजारीच हे नवं पाच मजली घर असणार आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांची भेट घेतली होती.

कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आधीचं निवासस्थान आहे. त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर बांधलं आहे. राज ठाकरे ६ नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला गेले आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. 

कसं आहे राज ठाकरे यांचं नवं घर?

‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तसेच इतर नागरिकांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांची भेट घेता येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.