पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यातील अनेक पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत. त्यात मुंबईचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली.
पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदाही राज्यातील अनेक पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा तसेच हेड कॉन्स्टेबल लखुजी परदेशी (मरणोत्तर) राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाले.
गुणवत्तापूर्ण सेवेचे पुरस्कार ३९ जणांना जाहीर करण्यात आले आहेत. त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरिंद्र कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक परमबीर सिंग यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपती पुरस्कार चौघांना जाहीर झाले आहेत. त्यात मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सदानंद दाते, औरंगाबादचे पोलीस आयुक्त संजीव कुमार, दहिसरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख तसेच पोलीस निरीक्षक मोतीराम पाखरे यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
सदानंद दाते, राजवर्धन यांच्यासह अनेकांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर
पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यातील अनेक पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत. त्यात मुंबईचे सहपोलीस
First published on: 26-01-2014 at 03:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadanand date rajvardhantwo maharashtra cops get presidents police medal for gallantry