Saif Ali Khan अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारीला हल्ला करण्यात आला. या हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस कसून तपास करत असून दिवसेंदिवस नवी माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याला १९ जानेवारीला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो पोलिस कोठडीमध्ये होता. आता त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीवन कोठडी सुनावली आहे.

आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात हल्लेखोर मोहम्मद शहजाद याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.पोलिसांनी आरोपीची तीन दिवस तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागितलेली होती, मात्र वांद्रे येथील न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सैफ अली खानला २१ जानेवारीला मिळाला डिस्चार्ज

अभिनेता सैफ अली खान काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. गुरुवारी पहाटे (१६ जानेवारी) सैफ अली खान घरात एक अज्ञात व्यक्ती घुसली होती. त्यानंतर झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खान घरी परतला आहे. अभिनेता घरी परत येतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सैफवर दोन शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर बांगलादेशी

सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर बांगलादेशी नागरिक आहे. त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ ​​विजय दास, असे आहे. त्याला १९ जानेवारीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात तो शिरला होता, असे त्याने कबूल केले आहे. याआधी त्याने कोलकातामधील रहिवासी असल्याचे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या या आरोपीने याआधी इतर बॉलीवूड कलाकारांच्या घरातही घुसण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला यश मिळू शकले नाही. सैफ अली खानवर आपण हल्ला केला आहे हे या आरोपीला माहीत नव्हतं. तो त्याच्या इमारतीत शिरला कारण या इमारतीत श्रीमंत लोक राहतात असं त्याला सांगण्यात आलं होतं. दरम्यान त्याने लपण्याचा प्रयत्न केला, तो ठाण्यातही गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि अटक केली.