सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी पाच वर्षांची शिक्षा झालेला मात्र सध्या जामिनावर बाहेर असलेला अभिनेता सलमान खान याने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुबई येथे मेअखेरीस होणाऱ्या एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेथे जाण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती सलमानने अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर सुट्टीकालीन न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सदोष मनुष्यवधाच्या आरोपाप्रकरणी दोषी धरून सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात सलमानने केलेले अपील उच्च न्यायालयाने दाखल करून घेत त्याची शिक्षा निलंबित केली आहे. तसेच अपील निकाली निघेपर्यंत न्यायालयाने त्याला सशर्त जामीनही मंजूर केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2015 रोजी प्रकाशित
परदेशवारीसाठी सलमान पुन्हा न्यायालयात
सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी पाच वर्षांची शिक्षा झालेला मात्र सध्या जामिनावर बाहेर असलेला अभिनेता सलमान खान याने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

First published on: 21-05-2015 at 03:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan asks high court for permission to travel to dubai