अपघातानंतर वैद्यकीय चाचणीसाठी अभिनेता सलमान खान याला आणण्यात आले त्या वेळेस त्याने मद्यपान केल्याचा वास येत होता, परंतु चाचणीदरम्यान तो मद्याच्या अमलाखाली नसल्याचे पुढे आले, अशी काहीशी विसंगत साक्ष जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरने गुरुवारच्या सुनावणीत दिली. या डॉक्टरने वैद्यकीय चाचणीसाठी सलमानच्या रक्ताचे नमुने घेतले होते. मात्र आपले हे निरीक्षण प्राथमिक स्वरूपाचे असून रासायनिक विश्लेषण अहवालातूनच नेमकी स्थिती स्पष्ट होऊ शकते, असेही या डॉक्टरने ही साक्ष देताना स्पष्ट केले.
सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत सलमानविरोधात सत्र न्यायालयात नव्याने खटला चालविण्यात येत असून अपघातानंतर वैद्यकीय चाचणीसाठी सलमानच्या रक्ताचे नमुने घेणाऱ्या या डॉक्टरची साक्ष नोंदविण्यात आली. त्या वेळेस त्याने सलमानच्या स्थितीबाबतचा काहीसा विसंगत दावा केला.
दरम्यान, वैद्यकीय कागदपत्रांवरील ‘मद्य’ हा शब्दप्रयोग हेतूत: घालण्यात आल्याचा आरोप सलमानच्या वकिलांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2015 रोजी प्रकाशित
सलमान प्रकरणात डॉक्टरची संदिग्ध साक्ष
अपघातानंतर वैद्यकीय चाचणीसाठी अभिनेता सलमान खान याला आणण्यात आले त्या वेळेस त्याने मद्यपान केल्याचा वास येत होता
First published on: 23-01-2015 at 04:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan hit and run case two versions on whether the actor was drunk