समीरची आई समीरच्या वडिलांना प्रेमाने दाऊद नावाने हाक मारायची; क्रांती रेडकरचा खुलासा

“निकाह नामा बरोबर आहे. समीर यांनी कायदेशीरित्या त्यांचं नाव बदललं नव्हतं,” असं क्रांती रेडकरने एएनआयशी बोलताना म्हटलंय.

sameer wankhede kranti redkar
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली माहिती (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत की नाही यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचसंदर्भात समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज एक अगदीच वेगळा दावा केला असू हा दावा सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे. समीर यांच्या वडिलांबरोबरच त्यांच्या पत्नीने म्हणजे क्रांती रेडकरेनेही दाऊद नाव निकाह नाम्यावर कुठून आलं याबद्दलचं उत्तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं आहे.

समीर वानखेडेंनी मुस्लीम धर्म स्वीकारला असून समीर वानखेडेंचं लग्न देखील मुस्लीम धर्मीय असल्यामुळेच मुस्लीम पद्धतीने झालं, असा दावा देखील केला जात असताना खुद्द समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. एकीकडे “आईच्या आग्रहाखातर मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला”, असं समीर वानखेडेंनी स्पष्ट केलेलं असताना त्यांच्या वडिलांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपण हिंदूच असल्याचा दावा करणारे पुरावे सादर केले आहेत.

तिथे चुकून मुस्लीम लिहिलं असेल…
समीर वानखेडेंच्या लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबीय मुस्लीम असल्याचा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. मात्र, हा दावा समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी फेटाळून लावला आहे. “लग्नाच्या वेळी दोन वेगवेगळे धर्म असतील तर निकाह होत नाही. मुस्लीम धर्माच्या नियमानुसार दोघं एकाच धर्माचे (इस्लाम) असतील तरच निकाह कबूल होतो. हिंदू-मुस्लीम यांच्यात निकाह होत नाही. त्यामुळे कदाचित माझ्या पत्नीने तिथे मुस्लीम वगैरे लिहिलं असेल. प्रेमाने काहीतरी लिहिलं असेल. पण माझ्या सर्व कागदपत्रांमध्ये हिंदूच आहे”, असा दावा त्यांनी केला आहे.

दाऊदवरुन सोशल नेटवर्किंगवर चर्चा
विशेष म्हणजे सोशल नेटवर्किंगवर ज्या गोष्टीची चर्चा आहे ती दाऊद नावाची. “माझी बायको मुस्लीम होती. कुणी प्रेमाने मला दाऊद देखील म्हणत असेल. कदाचित माझी पत्नी देखील मला दाऊद बोलली असेल. घरात कुणाला आपण काही नाव देतो. तसं काही नाव घेतलं असेल. पण माझ्या सरकारी कागदपत्रांमध्ये नाव डी वानखेडे असंच लिहिलं आहे. माझ्या सर्विस बुकमध्ये ज्ञानदेव कचरू वानखेडे असं नाव लिहिलं आहे. हे माझं खरं नाव आहे”, असा दावा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. पत्नीने प्रेमाने दिलेलं नाव हे दाऊद असल्याच्या मुद्द्यावरुन सोशल नेटवर्किंगवर सध्या चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.

निकाह नामा बरोबर आहे. समीर यांनी कायदेशीरित्या त्यांचं नाव बदललं नव्हतं. केवळ फॉरमॅलिटी म्हणून त्यांनी आईच्या आनंदासाठी निकाह केला होता. नवाब मलिक यांनी शेअर केलेला जन्माचा दाखला चुकीचा आहे असं क्रांती म्हणालीय.

आई प्रेमाने दाऊद बोलायच्या…
दुसरीकडे झी न्यूज हिंदीला समीर वानखेडेंच्या पत्नीने म्हणजेच क्रांती रेडकरने दिलेल्या मुलाखतीमध्ये समीर यांची आई समीर यांच्या वडिलांना प्रेमाने दाऊद हाक मारायची असं म्हटलं आहे. “निकाह नाम्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असं नाव लिहिलं आहे तो योग्य आहे?”, असा प्रश्न क्रांतीला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना क्रांतीने, “समीरची आई समीरच्या वडिलांना प्रेमाने या नावाने बोलवायची, म्हणून कदाचित यामुळे त्यांनी तिथे टोपणनाव लिहिलं असेल,” असं उत्तर दिलं. अनेकांनी यावरुन ट्रोलिंग सुरु केलं आहे.

बेबी सोनू ऐकलं होतं पण…

हा शो आता…

मला उर्दू येत नाही…
“निकाह नामा उर्दूत लिहिला आहे. तिथली सही बरोबर आहे. मला उर्दू येत नाही. पण हा निकाह झाला आहे. डॉक्टर शबाना कुरेशीसोबत निकाह झाला. त्यांचं जमलं नाही. मग काही वर्षांनी त्यांनी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला. नवाब मलिकांनी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात इतकं जायला नको. कदाचित मी याविरोधात कोर्टात देखील जाऊ शकतो”, असं ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhade mother use to call his father as dawood says kranti redkar scsg

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या