मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वानखेडे कुटुंबानंतर आता नवाब मलिकांनी क्रांती रेडकरच्या कुटुंबावर निशाणा साधलाय. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी समीर वानखेडेंनी उत्तर देण्याची मागणी केली होती. तर मलिक यांच्या नव्या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“अशा प्रकरणात एका महिलेचे नाव लोकांसमोर प्रसारित करून खूप चांगले काम केलेस मित्रा. खरं तर, आम्ही जेव्हा प्रेस रिलीझ जारी करतो, तेव्हा आम्ही महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांची नावे देखील शेअर करत नाही,” असं समीर वानखडे म्हणाले.  तसेच “क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?” असा सवालही वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिक यांनी हर्षदा रेडकरवर केलेल्या आरोपांसदर्भात एक नवीन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे”. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे.