scorecardresearch

Premium

“उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घराच्या चाव्या…”; एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील संपत्तीबाबत गौप्यस्फोट केला. त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.

Sanjay Raut Eknath Shinde Uddhav Thackeray 2
ऋषी सुनक यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील संपत्तीबाबत एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट केला. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी २० परिषदेच्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेख करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट केला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच एका बिल्डरचं नाव घेत एकनाथ शिंदेंनाच उलट प्रश्न विचारला.

संजय राऊत म्हणाले, “मला याविषयी माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील कथित घराच्या चाव्या अजय अश्रफ नावाच्या बिल्डरकडे असतील. अशाप्रकारे बोलल्याने त्यांच्यावरील ५० खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं.”

Shiv Sena statewide convention begins in Kolhapur in the presence of the Chief Minister
शिवसेनेच्या महाअधिवेशनात मोदी-शहांच्या अभिनंदनाचे ठराव; कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ
Former Dutch PM and wife die hand in hand
नेदरलँडचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वीकारलं स्वेच्छामरण! एकमेकांचे हात हातात घेत जगाचा निरोप
Accusation between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Abhishek Ghosalkar murder case
गोळय़ा मॉरिसने झाडल्या की अन्य कुणी? उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
narendra modi
ऐक्याच्या संदेशासाठी धर्मगुरू संसदेत मोदींच्या भेटीला!

“कुणाची कमाई कोणत्या देशात जाते हे सर्वांना माहिती”

“मुंबईसह ठाण्यात सध्या बिल्डरांचं राज्य सुरू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. यातून केलेली कमाई कोणत्या देशात जाते आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जाते हेही सर्वांना माहिती आहे. आम्हाला बदनाम करून एकनाथ शिंदेंवरील डाग धुतले जाणार नाहीत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“लोक २०२४ निवडणुकीत यांच्या तोंडावर चिखल लावणार”

संसद कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर सत्ताधारी पक्ष भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ मुद्रित केले जात असल्याच्या वृत्तावरून संजय राऊत म्हणाले, “मोदी सरकारला संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचं फूल लावू द्या. मात्र, जनता २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण चिखल लावणार आहे. हे बनावट कमळ लावून काहीही होणार नाही. लोक यांच्या तोंडावर चिखल लावणार आहेत.”

हेही वाचा : ऋषी सुनक यांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट, म्हणाले, “ते लंडनला…”

“सरकारला मनोज जरांगे पाटील यांना संपवायचं आहे”

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. “या सरकारला मराठा आरक्षणावर काहीच करायचं नाही. हे सरकार घाबरट आहे. हे सरकार केवळ आश्वासन देतं. या सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं आहे, संपवायचं आहे. त्यांना काहीही काळजी नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut answer eknath shinde over uddhav thackeray london property allegations pbs

First published on: 13-09-2023 at 17:50 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×