शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी मोठं विधान केलं आहे. “सरकार सखोल चौकशी करणार आहे, तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता येथून चौकशी करा,” अशी मागणी संजय राऊतांनी केली. तसेच हा लाठीहल्ला का करण्यात आला याचंही कारण सांगितलं. ते रविवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “सरकार वैफल्यग्रस्त झालं आहे. सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही. त्यांनी एका बाजूला चर्चा केली आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला केला. हा काय प्रकार आहे. ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीहल्ला सुरू झाला त्यावेळी मुंबईत इंडिया गटाची जोरदार बैठकही सुरू होती. महाराष्ट्रासह देशातील संपूर्ण माध्यमे उद्धव ठाकरे काय बोलतात, राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष देऊन होते.”

vijay wadettiwar, budget 2024,
अर्थसंकल्पावर वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले, “ही तर काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी”
Jayant Patil On Ajit Pawar
“मोदी सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “राज्यातल्या खासदारांनी…”
priyanka gandhi on sanvidhaan hatya diwas,
संविधान हत्या दिनाच्या निर्णयावरून प्रियांका गांधींचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “ज्यांनी संविधानाच्या अंमलबजावणीला…”
mamata banerjee on samvidhaan hatya diwas
संविधान हत्या दिन: अमित शाहांच्या घोषणेबाबत प्रश्न विचारताच ममता बॅनर्जी काही क्षण थांबल्या, नंतर म्हणाल्या…
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
Thackeray group unannounced boycott of work Protest against the suspension of Ambadas Danve
ठाकरे गटाचा कामकाजावर अघोषित बहिष्कार; अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा निषेध
amol kolhe
“केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, लोकसभेतील पहिल्याच भाषणात अमोल कोल्हेंची मागणी; म्हणाले…
Cancel Asaduddin Owaisis Parliament Membership Navneet Ranas letter to the President
“ओवेसींचे संसद सदस्‍यत्‍व रद्द करा,” नवनीत राणा यांचे राष्‍ट्रपतींना पत्र; म्हणाल्या, “जय पॅलेस्‍टाईनच्या घोषणा देऊन त्यांनी…”

“माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी लाठीहल्ल्याचे आदेश दिले का?”

“ही बैठक देशभरात दाखवली जात होती. त्यावरील माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी या लाठीहल्ल्याचे आदेश दिले का? मराठा समाजाने आतापर्यंत इतके मोर्चे काढले. ते सर्व मोर्चे शांतपणे, शिस्तबद्धपणे काढले. त्यांनी लाखो लाखोंचे मूक मोर्चे काढले. कधीही त्यांच्याकडून बेशिस्तपणा घडला नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“…तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता येथून चौकशी करा”

संजय राऊत पुढे म्हणाले, “आधीच्या मोर्चांमध्ये आंदोलकांसह पोलिसांनीही या संयम राखला. हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही घडलं आहे. तेव्हा पोलिसांनी लाठी उगारली नाही. मराठा समाजातील आंदोलकांनी संयम सोडला नाही. मग काल अचानक जालन्यात हे का घडलं? याची सरकार सखोल चौकशी करणार आहे, तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता येथून चौकशी करा.”

हेही वाचा : “अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा…”; संजय राऊत शिंदेंसह मोदी-शाहांवर काय बोलले? वाचा…

“…म्हणून सरकारने जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला”

“मी परत सांगतो, मुंबईत शिवसेनेने यजमानपद भुषवलेल्या देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या बैठकीला गालबोट लागावं म्हणून हा लाठीहल्ला केला. त्यासाठी मराठा तरुणांचे, महिलांचे, वृद्धांचे, मुलांचे बळी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.” असा आरोप संजय राऊतांनी केला.