स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये सुरू असलेल्या गुंतवणूकदारांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Davos 2023 : महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

काय म्हणाले संजय राऊत?

“ही गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखरच येणार असेल, तर त्याचे स्वागतच केलं पाहिजे. मात्र, त्यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली. तेव्हा ती रोखण्यासाठी ना मुख्यमंत्र्यांनी काही प्रयत्न केले, नाही उद्योग मंत्र्यांनी. आता डाव्होसमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची जत्रा भरते आहे. त्यातून सव्वा लाख कोटींची गुंतणूक येणार आहे. म्हणतात, ती आली की आम्ही त्यावर बोलू. ते उद्योग इथे येतील, लोकांना रोजगार मिळेल. तेव्हाच त्यावर बोलणं योग्य ठरेल”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – Escort Service in Davos: डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी; अतिश्रीमंतांनी केलं ‘जीवाचं डाव्होस’!

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी”

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगसमोर होणाऱ्या सुनावणीबाबतही प्रतिक्रिया दिली. “शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो. मात्र, शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होऊ शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे. शिवसेना एकच आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – पहिली बाजू: गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य

“भारत जोडो यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये जाणार”

दरम्यान, यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असल्याचीही माहिती दिली. “३० जानेवारी रोजी होणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी मी जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहे. यावेळी तेथील शिख समाज आणि काश्मीरी पंडीतांचीदेखील भेट घेणार” असल्याचे ते म्हणाले.