महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने झालेल्या १४ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना करोना काळातही हलगर्जीपणा झाला होता, असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. दरम्यान, यावरून आता संजय राऊतांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “न्यायालयातील अन्य निकाल मॅनेज होतात, मग…”; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र!

काय म्हणाले संजय राऊत?

भारतीय जनता पक्षाने काही पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या. नोटबंदीच्या वेळेस हजारोंच्यावर लोक रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडल होते. तो सदोष मनुष्यवधच होता. त्यावरही भाजपाच्या पोपटांना बोलावं. करोनाच्या वेळेस गंगेत हजारो प्रेतं वाहत आली होती. गुजरातमध्ये तर प्रेतं जाळायला जागाही नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच राज ठाकरे हे जगाचे नेते आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Maharashtra News Live : खारघर दुर्घटनेवरून संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

खारघरमधील दुर्घटनेवर बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. “करोनाच्या काळातही अनेक प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. तिथेही अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला सदोष मनुष्यवधाचा खटला आजही दाखल करता येऊ शकतो. याचं राजकारण करायला नको. सकाळची वेळ निवडायला नको होती. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना द्यायला हवा होता. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार मिळाला आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र जे घडलं तो अपघात आहे. अपघाताचं राजकारण कुणीही करू नये.” असं ते म्हणाले होते.