मुंबईच्या सांताक्रुझमधील व्यापारी कमलकांत शाह यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाह यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्या पत्नी ४६ वर्षीय काजल यांनी ४५ वर्षीय प्रियकर हितेश जैनच्या मदतीने कमलकांत यांना जेवणातून विष दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विमा कंपनीत असलेल्या पतीच्या पॉलिसींसंदर्भात आरोपी पत्नीने चौकशी केल्याचे तपासात समोर आले आहे.

“४६ वर्षीय कमलकांत शाह यांच्या रक्तात ‘आर्सेनिक’ आणि ‘थॅलियम’ अतिरिक्त प्रमाणात आढळून आले. १९ सप्टेंबरला शरिरातील सर्व अवयव निकामी झाल्यानंतर शाह यांचा मृत्यू झाला होता. याच लक्षणांमुळे शाह यांच्या आई सरला यांचाही १३ ऑगस्टला मृत्यू झाला”, असे निरिक्षण अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के एस झंवर यांनी आरोपींना पोलीस कोठडी ठोठावताना नोंदवले आहे. आरोपींना न्यायालयाने आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला? नार्को चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे

२४ ऑगस्टला कमलकांत यांना अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडून औषध घेतल्यानंतरही त्रास कमी न झाल्याने त्यांना अंधेरीच्या ‘क्रिटीकेअर’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कमलकांत यांच्या आईदेखील याच त्रासाने हैराण होत्या. क्रिटीकेअर रुग्णालयातील उपचारांनंतर कमलकांत यांना बॉम्बे रुग्णालयात भरती करण्यात आले.

नाशिक: आईकडूनच मद्यपी मुलाच्या खूनाची सुपारी; आईसह मारेकरी ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कमलकांत याचे अवयव निकामी होऊ लागल्यानं डॉक्टरांना धक्का बसला. त्यांच्या रक्तात धातू असल्याचा संशय आल्याने रक्ताचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले. १३ सप्टेंबरला आलेल्या या अहवालात आर्सेनिकची उच्च पातळी सामान्यपेक्षा ४०० पट तर थॅलियमची पातळी सामान्यपेक्षा ३६५ पटींनी जास्त आढळून आली. हे विषारी पदार्थ कोणीतरी कमलकांत यांना दिल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता”, अशी माहिती शाह यांचे मेहुणे अरुण लालवानी यांनी दिली आहे. दोन्ही आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.