उन्हाळी हंगामात एसटीच्या बस गाडय़ांना वाढती मागणी, लक्षात घेऊन ३० एप्रिल आणि १ मे या कालावधीत एसटीच्या जादा गाडय़ा चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. पहिल्या दिवशी ५० तर दुसऱ्या दिवशी ५० अशा एकूण १०० फे ऱ्यां चालवण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाडय़ांना प्रवाशांकडून अधिक मागणी आहे. याचधर्तीवर या दोन दिवसांत प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई विभागातून तब्बल १०० जादा फे ऱ्या चालवण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्याने सांगितले. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे दरवर्षी एसटीकडून जादा गाडय़ा सोडण्यात येतात.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2016 रोजी प्रकाशित
शनिवार, रविवारी एसटीच्या जादा गाडय़ा
पहिल्या दिवशी ५० तर दुसऱ्या दिवशी ५० अशा एकूण १०० फे ऱ्यां चालवण्यात येणार आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 29-04-2016 at 00:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturday sunday st additional buses