धवारी गोरेगाव, आरे जंगलातून वनविभागाने सी-५५ बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यानंतर तीन वर्षाच्या या नर बिबट्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू सेंटरमध्ये करण्यात आली आहे. आता वनविभागाने आणखी एका बिबट्याचा शोध सुरू केला आहे. तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- विश्लेषण: आरे कॉलनीत बिबट्यांचे माणसांवर हल्ले का सुरू आहेत?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या इतिका लोटचा मृत्यू झाल्यानंतर आरेतील रहिवाशांनी बिबट्याला पकडण्याची मागणी केली. त्यानुसार इतिकावर बिबट्याने ज्या ठिकाणी हल्ला केला त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे दोन पिंजरे लावून वनविभागाने बुधवारी सकाळी सहा वाजता बिबट्याला जेरबंद केले. जेरबंद करण्यात आलेला बिबट्या नर असून तो तीन वर्षांचा आहे. त्याची प्रकृती ठणठणीत आहे. त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा- पाच वर्षांत पुनर्वसनातील घर विकण्यास परवानगी देण्याची घोषणा हवेतच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरेत दोन बिबटे संशयित आहेत. त्यानुसार सी-५६ या बिबट्याचा शोध आता वनविभाग घेत आहे. इतिकावर हल्ला करणारा बिबट्या नेमका कोणता, सी-५५ की सी-५६ हे सांगणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. कारण हे दोन्ही बिबटे युनिट क्रमांक १५, आरे दुग्ध वसाहतीच्या परिसरात वावरत आहेत.