भाजपच्या गळाला लागलेले मासे शिवसेनेने पळविल्यामुळे उभयतांमध्ये ठिणगी पडली असून भाजपने आता वाट न पाहता पक्षात येण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी दरवाचे खुले केले आहेत. तर थेट शिवसेनेतील काही इच्छुकांना पक्षात घेण्याची तयारीही भाजपने सुरू केली आहे. पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने चांगले उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेच्या दोन नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपच्या जिव्हारी लागले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार असलेले नगरसेवक वा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत म्हणून आता भाजपने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर, नगरसेविका सुखदा पवार, काँग्रेसच्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल आणि काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी मुरजी पटेल यांना शनिवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2016 रोजी प्रकाशित
शिवसेना-भाजपमध्ये पळवापळवी
भाजपच्या गळाला लागलेले मासे शिवसेनेने पळविल्यामुळे उभयतांमध्ये ठिणगी पडली असून भाजपने आता वाट न पाहता
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-05-2016 at 00:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp