हिंदूंचे सण जल्लोषातच साजरे होतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने दहीहंडीचा उत्सव सोमवारी जल्लोषात साजरा करण्यासाठी शिवसेना नेते व कार्यकर्ते कसून तयारी करीत आहेत. न्यायालयीन र्निबधांमुळे शिवसेना नेत्यांच्या रद्द झालेल्या बहुतांश दहीहंडय़ा आता मात्र उत्साहात साजऱ्या केल्या जाणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
दहीहंडीमध्ये १२ वर्षांखालील लहान मुलांना सहभागी करून घेऊ नये, असे आदेश राज्य बालहक्क आयोगाने दिले आहेत. तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना दहीहंडीच्या थरांमध्ये उतरवू नये, असे आदेश देत दहीहंडीच्या उंचीवर उच्च न्यायालयाने मर्यादा आणल्या. त्यामुळे मोठय़ा बक्षीसांच्या आणि अधिक उंचीची स्पर्धा लावणाऱ्या अनेक दहीहंडय़ा रद्द करण्यात आल्या. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने होणारा उत्सवही रद्द करण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उंचीवरील मर्यादा हटविली. मात्र केवळ हिंदूूंच्या सणांवर गंडांतर नको, अशी भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बालगोिवदा व दहीहंडीच्या उंचीवरील र्निबधाचे मात्र स्वागत केले. तरीही जल्लोषातच हा सण साजरा होईल, असे जाहीर केले. त्यामुळे आधी रद्द करण्यात आलेला प्लाझा चित्रपटगृहाजवळील दहीहंडी उत्सवही आता जल्लोषात साजरा केला जाणार आहे. शिवसेना नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग असतो. मुंबई, ठाणे शहर व जिल्ह्य़ातही शिवसेना नेत्यांना सूचना देण्यात आल्याने न्यायालयीन र्निबधांचे पालन करीत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2014 रोजी प्रकाशित
दहीहंडीच्या जल्लोषासाठी शिवसेना नेते सज्ज
हिंदूंचे सण जल्लोषातच साजरे होतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने दहीहंडीचा उत्सव सोमवारी जल्लोषात साजरा करण्यासाठी शिवसेना नेते व कार्यकर्ते कसून तयारी करीत आहेत.
First published on: 18-08-2014 at 03:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leaders ready to celebrate dahi handi festival