नेहमी आपल्या रोखठोक वक्तव्यांनी विरोधकांच्या टीकेचा सामना करणारे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे. संजय राऊत यानिमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असून लग्नासाठी निमंत्रण देत आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.

दरम्यान लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.

रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. यानिमित्ताने पुन्हा एकदा संजय राऊत आणि पवार कुटुंबातील स्नेहसंबंध समोर आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut dance with ncp supriya sule in sangeet program of daughter sgy
First published on: 28-11-2021 at 11:57 IST